Breaking News
Loading...
Wednesday, 10 June 2015

Info Post
लग्नाची ही पहिली दोन-तिन वर्षे मात्र छान गुलाबी, मऊ, तरल आणि स्वप्नाळू असतात
हातात हात घालून गप्पा मारायचे असतात,नवनवीन स्वप्न रंगवायची असतात.
पण हे ही दिवसही पटकन उडून जातात आणि कदाचित ह्याच काळात बैंकेतील शुन्य थोडेसे कमी होतात, कारण थोड़ी हौस-मौज केली जाते, थोड हिंडन-फिरण होत, खरेदी होते
मग हळूच चाहुल लागते बाळाची
आणि वर्ष भरातच पाळणा हलू लागतो
सर्व लक्ष आता बाळावर केन्द्रित होते
त्याच खाण-पिण, उठ-बस, शी-शु
त्याची खेळणी, त्याचे कपड़े, त्याचे लाड कौतुक...वेळ कसा फटाफट निघून जातो
एव्हाना तिचा हाथ नकळत त्याच्या हातून सूटलेला सतो, गप्पा मारन, हिंडन-फिरण केंव्हाच बंद झालेले असत, पण दोघांच्याही हे लक्षात येत नाही.
अशातच तिशीचा उंबरठा ओलांडलेला जातो.
बाळ मोठ होत जात..ती बाळात गुरफटत जाते आणि तो आपल्या कामात.
घराचा हप्ता,गाडीचा हप्ता आणि त्यात बाळाची जबाबदारी; त्याच्या शिक्षणाची, भविष्याची सोय आणि त्याच बरोबर बैंकेत शून्य वाढवायचे टेंशन.
तो पूर्ण पणे स्व:तला कामात झोकुन देतो.
बाळाचे शाळेत admission होते, तो मोठा होवू लागतो. तिचा सगळा वेळ बाळाचे उठ-बस करता करता संपतो.
एव्हाना पस्तिशी आलेली आसते,
स्व:तच घर असत, गाडी असते.
बैंकेत बर्यापैकी शून्य जमा झालेले असतात पण तरी ही काही तरी कमी असते आणि पण ते काय ते समजत नसते, त्यामुळे तिची चिडचिड वाढलेली असते
आणि त्याचा ही वैताग वाढत जातो आणि तो मग दर वीकेंड ला ' एकच प्याला ' सुरु करतो
दिवासामागुन दिवस जात असतात ; मूल मोठ होत असत, त्याच स्व:तच एक विश्व तयार होत असत..
त्याचीही दहावी येते आणि जाते
तो पर्यन्त दोघांनीही चाळीशी ओलांडलेली असते.
बैंकेत शुन्यांची भर पडतच असते.
एका निवांत क्षणी,त्याला मग ते जुने दिवस आठवतात
वेळ साधुन "तो" तिला म्हणतो, अग, ये ज़रा अशी समोर, बस जवळ; पुन्हा एकदा हातात हात घालून गप्पा मारू, कुठ तरी फिरायला जावू...
ती ज़रा विचित्र नजरेनेच त्याच्याकडे बघून म्हणते ' कुठल्या वयात काहीही सुचत तुम्हाला ; ढीगभर काम पडलीयत मला आणि तुम्हाला गप्पा सुचतायत '
कमरेला पदर खोचुन ती निघून जाते..
मग येते पंचेचाळीशी, डोळ्यावर चश्मा चढलेला असतो; एक दोन सुरुकुत्या डोकावत असतात, केस आपला काळा सोडू लागलेले असतात...मूल आता college मध्ये असत.. बैंकेत शून्य वाढत असतात...तिन आपल नाव भजनी मंडळात मध्ये घातलेल असत... आणि ह्याचे वीकेंड चे ' एकच प्याला ' चे कार्यक्रम सुरुच असतात...
मूल college मधून बाहेर पडत...आपल्या पायावर उभ राहत, आता त्याला पंख फुटलेले असतात आणि एक दिवस ते दूर परदेशी उडून जात..
आता त्याच्या केसांनी काळ्या रंगाची आणि काही ठिकाणी डोक्याची साथ सोडलेली असते...तिलाही चश्मा लागलेला असतो. आता "तो" तिला म्हातारी म्हणु लागतो, कारण हाच म्हातारा झालेला असतो..
पंच्च्चावन सोडून 'साठी' कड़े वाटचाल सुरु होते... बैंकेत आता किती शून्य आहेत हे ही त्याला माहीत नसत..एकच प्यालाचे कार्यक्रम एव्हाना आपोआप बंद होत आलेले असतात...
औषध-गोळ्या यांच्या वेळ वार ठरलेले असतात...डॉक्टरांच्या तारखाही ठरलेल्या असतात...मूल मोठ झाल्यावर लागतील म्हणून घेतलेल चार-पाच खोल्यांच घर अंगावर येत असत..
आता मूल कधीतरी परत येतील ही वाट बघन तेवढच काय ते हातात असत...
आणि तो एक दिवस येतो..संध्याकाळची वेळ असते म्हातारा झोपळयावर मंद झोके घेत बसलेला असतो...म्हातारी तिन्ही सांजेचा दिवा लावत असते...म्हातारा लांबून हे बघत असतो आणि तेवढ्यात फोन वाजतो...तो लगबगीने जावून फोन घेतो, समोरुन मुलगा बोलत असतो..मुलगा आपल्या लग्नाची बातमी देतो आणि परदेशीच राहणार असेही सांगतो. म्हातारा थोड़ा गड़बड़तो, काय बोलावे हे त्याला सुचतच नाही, म्हातारा मुलाला बैंकेतल्या शुन्या विषयी काय करायच ते विचारतो... आता परदेशातल्या शुन्याच्या मानाने म्हातार्याचे शून्य म्हणजे मुलाच्या दृष्टीने चिल्लरच असते...तो म्हातार्याला एक सल्ला देतो ' एक काम करा त्याचा एक ट्रस्ट करा आणि वृद्धाश्रमाला दया आणि तुम्हीही तिथेच रहा ' पुढच थोडस जुजबी बोलून मुलगा फ़ोन ठेवून देतो.
म्हातारा पुन्हा झोपळयावर येवून बसतो, म्हातारीची दिवाबत्ती होत आलेली असते
" तो " तिला हाक मारतो ' अग ये आज पुन्हा हातात हात घालून गप्पा मारू '
म्हातारी चक्क म्हणते ' हो आलेच '
म्हातार्याला विश्वासच वाटत नाही, आनंदाने त्याचा चेहरा उजळून निघतो.
त्याच्या डोळ्यात अश्रु दाटून येतात, त्याच्या एका डोळ्यातून एक अश्रु खाली येतो
तो गालावर येतो आणि अचानक थिजुन जातो, डोळ्यातल तेज कमी कमी होत जात...आणि ते निस्तेज होतात...
म्हातारी आपल आटपुन म्हातार्या शेजारी झोपाळयावर येवून बसते आणि म्हणते बोला काय बोलायचय.. पण म्हातारा काहीच बोलत नाही..ती म्हातार्याला हात लावते..शरीर थंड गार पडलेले असते आणि डोळे एकटक म्हातीराला बघत असतात
क्षणभर म्हातारी हादरते; सुन्न होते, तिला काय कराव हेच सुचत नाही, पण एक-दोन मिनिटात ती लगेच सवारते...
हळूच उठते, पुन्हा देवघरापाशी जाते, एक उदबत्ती लावते, देवाला नमस्कार करते; आणि पुन्हा झोपाळयावर येवून बसते.
म्हातार्याचा थंडगार हात घेते आणि म्हणते ' चला कुठे जायचय फिरायला' आणि काय गप्पा मारायच्यात तुम्हाला? बोला...'
अस म्हणत, म्हातारीचे डोळे पाणवतात, एकटक नजरेन ती म्हातार्याकडे बघत असते आणि हळूच तिच्या डोळ्यातले अश्रु गोठून जातात.
आणि म्हातारीची मान अलगद म्हातार्याच्या खांद्यावर पड़ते.
झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो.
झोपाळ्याचा मंद झोका सुरूच असतो....
त्यासाठी नुसते शुन्यच जमा करत बसु नका मुलासाठी. नाही तर तुमचे आय़ुष्य शुन्य होईल.
हे ज्याने लिहले आहे खरच खुप छान त्याला मा झा सलाम.
Dedicate to all office workers.......
Pls share it...

0 comments:

Post a Comment