Breaking News
Loading...
Wednesday, 18 February 2015

Info Post
जि.प. शाळेबाबत अज्ञात व्यक्तीने घेतलेला सुंदर अनूभव
पेनची नळी!!
पुण्याला जात असताना धाब्यावर चहापाण्यासाठी थांबलो ...
एक १२ /१३ वर्षाचा साधे कपडे घातलेला चुणचुणीत मुलगा माझ्या मागे मागे रेंगाळत असल्याच जाणवलं ....
चहापान झाल्यावर निघालो तेंव्हा माझी नजर त्याला शोधत होती ...
गाडीपासून २०/२५ फुटावर झाडाच्या अडोस्याला 'तो' उभा होता..
नजर माझ्याकडे.
मी त्याला जवळ बोलावलं ..
"भूक लागली का?" विचारल
तो मानेनच नाही म्हणाला ...
माझी उत्सुकता वाढली ...
"पैसे पाहिजेत ??"
"नाही."
"मग.??"
पाठीमागे लपवलेली पुष्ट्याच्या प्याड, निबंधाची वही अन रिफील संपलेला रुपयाचा पेन ( use & throw ) त्यान दाखवला.
.."पेनची नळी संपली ...
घेऊन द्या न ..!!"
मी ५ रुपये दिले.
तो .."पैसे नको नळी घेऊन द्या"
मी म्हटलं "का?"
तो "माझी माय म्हणली कुणा कडून फुकटचे पैसे घ्यायचे नाही
....मी जितके फुकटचे पैसे घेइल तितक माझ्या मायच आयुष्य कमी हुइल .!!!!
त्याच उत्तर ऐकून माझ्या डोक्यात प्रश्नाचं काहूर उठलं..
माझी माणुसकीची नशा...खाडकन उतरली ..
दातृत्वाच ढोंग त्याच्या एका संस्कारापुढे कवडीमोल ठरलं.
मी गाडीतून उतरलो ...त्याच नाव विचारल ..बंड्या .
बंड्या मला टपरी कडे घेऊन गेला ..
पेन घेतल्यावर बंड्या खुलला
माझ्या डोक्यातल्या प्रश्नांच्या गुंत्यातून मी एक एक प्रश्न काढू लागलो. .
मी :- कितवीत आहेस ?
बंड्या:- मराठी ७ वित ...
मी :- काय लिहितोस ???
बंड्या :-निबंध... माझी आई !!!!
मी :- कुठ राहतोस ?
बंड्याने शेताकड बोट दाखवलं ...लांब वर एक झोपडी दिसत होती ..बंड्याचा बाप शेतावर
जागल्या होता.. आई शेतावर मजुरी करत होती ..बंड्याला चार लहान भावंड होती.
मी वही हातात घेऊन चाळली...
बंड्या झेड पी च्या शाळेत होता.
त्याच पूर्ण नाव वाचल.
अन मग विचारल "माझ्याकडच नळी का मागितली ..?"
बंड्या गांगरला ..
मी परत विचारल "इथ इतके लोक आहेत मग माझ्याकडच नळी का मागितली.?"
बंड्या : "तुमच्याच खिशाला मला पेन दिसला म्हणून .!!!"
मग मी सगळीकडे बघितलं ...बरेचसे लोक टी शर्ट वर होते .काहींना खिसे नव्हते ..तर काहींच्या खिशाला पेन नव्हते ..
बंड्याचे निरीक्षण अचूक होते ...
माझ्या खिशाला माझा आवडता पेन होता .
मी : "तुला कोण व्हायचं ?मोठा झाल्यावर .
बंड्या : "फौजदार !!!"
मी : "फौजदार ? कसा काय ?? कुणी सांगितलं .??"
बंड्या : "मास्तर म्हणले कि मी खूप अभ्यास केला कि फौजदार होईल ... !!"
मला त्याच उत्तर आवडल ...!!
माझ्या बरोबरचे मित्र वैतागले होते ...!
स्वताच्या आयुष्याला फुकटचे पैसे न घेण्याच्या संस्कारशी जोडणाऱ्या त्या माउलीला
अन
निरागस डोळ्यांमध्ये फौजदार होण्याच स्वप्न देणाऱ्या झेड पी च्या गुरुजींना मी मनोमन नमस्कार केला.!!!.
माझ्या खिशाचा आवडता पेन काढला ... बंड्या च्या खिशाला लावला.!
त्याच्या खांद्यावर हात ठेवला ..अन माझ्या आवडत्या देशाच्या भावी इन्स्पेक्टरसी शेकह्यंड करून गाडीत बसलो.!!
गाडी निघाली ...बंड्या च्या डोळ्यात चमक आली होती !!!
बंड्या बराच वेळ गाडीकडे बघत हात हलवत होता ...!!.
मी निश्चिंत होतो ........
कितीही भ्रष्टाचार वाढो...…
माझ्या देशाच भविष्य उज्वल असल्याबद्दल मला खात्री पटली ……!!
#MarathiKavitaBlog

0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.