Breaking News
Loading...
Friday 19 September 2014

Info Post
एखाद्या लाकडाला किंवा कुठल्याही गोष्टीला लागलेल्या आगीचा गुणधर्म एकच ...
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व ज्वलनशील पदार्थांवर आग पसरवणे ...
जोपर्यंत आजूबाजूला ज्वलनशील गोष्टी आहेत तोवर ठीक ...
पण एकदा त्या जळून गेल्या की मग काय ...
मग ते लाकूड स्वतः देखील त्या आगीत जळून खाक होतं ... आग शेवटी त्या लाकडाचीच राख करते ...
अहंकाराच अन अहंकारी माणसाचं पण काही तसंच आहे ...
ही अहंकाराची आग एकदा लागली की ती नाते-संबंध, विश्वास ह्या सगळ्याच गोष्टींत ठिणग्या पेटवून देते ...
सगळीकडे आग आपल्या 'कर्तृत्वा'मुळे लागलीये ह्या भ्रमात जगणाऱ्या अहंकारी माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवावी ...
की ह्या सगळ्या गोष्टी जळून खाक झाल्या नंतर ती आग शेवटी त्याच्या अहंकारासोबत त्याच्याच अस्तित्वाची सुद्धा राख करेल ...
बरं एकदाची जळून राख झाली तरी बेहत्तर ...
पण कधी कधी ती आग 'विस्तवा'च्या रूपाने कायम धगधगत राहते ...
आणि एकदाचं जळून खाक न होता हे असं कायमचं थोडं थोडं 'भाजत' राहणं जास्त त्रासदायक असतं !!!


#MarathiKavitaBlog

0 comments:

Post a Comment