तू माझ्या आयुष्यात नसण,
हे तर प्रत्येक क्षणाला मारण्यासारखं ..
पण तुझं नसण आता खोल कुठेतरी जाणवायला लागलय,,
म्हणूनच लवकर ये ..
माझ्या मनाचा बांध तटायच्या आधी ये..
अन उरात धडपडणारे श्वास थांबण्याआधी ये, जीवनाची शिवण उसवण्याआधी ये..
लवकर ये..
मी तुझी वाट पाहतेय,,
क्षितिजापल्याड काहीतरी शोधतेय ,
शोधताना पडून ,ठेचकाळून ..
रक्तबंबाळ होतानाही .. माझे श्वास तुझेच असतात
अन तुझे श्वास माझे..
निदान माझ्या स्वप्नांच्या अवकाशात ये ..
माझा आत्मा तुझ्याचभोवती रुंजी घालतोय ,
त्याच्यासाठी तरी ये ,.....
तू ये किंवा नको येऊ , पण माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत ..
मी तुझी अन फक्त तुझीच वाट पाहणार आहे..
कारण ..
या वेड्या मनाला ..
तुझी अन फक्त तुझीच ..
ओढ आहे..—
Tu ani Tujhya Aathvani...
Info Post
0 comments:
Post a Comment
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.