Breaking News
Loading...
Wednesday 7 May 2014

Info Post

Facebook
सध्या facebook ही गोष्ट आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक होत चालली आहे. याचा नेमका कसा परिणाम होतो याचा आढावा घेणारी  ही कविता! (खरे म्हणजे या कवितेच्या शीर्षकातच सारं काही आलं आहे, फार काही लिहिण्याची गरज नाही   )

आमचं बुआ आता सगळं virtual होत चाललंय
total friends किती हेच आता real होत चाललंय

उठलं  की पहिलं  काय  तर  facebook check करायचं
झोपताना  शेवटी काय  तर  facebook check  करायचं

हल्ली आमची संभाषणे , मनातली गुपितं म्हणजे “status” होत  चाललयं
हल्ली आमचे आनंद ,दु:ख सारं  काही  म्हणजे “status” होत  चाललयं

गाडी घेतली ,मोबाईल  घेतला त्यापेक्षा ,”Likes” किती मिळाले महत्वाचं
एखाद्याची status परत “single” झाली त्यापेक्षा ,”Likes ” किती मिळाले महत्वाचं

(या  सगळ्यावर आई /समस्त पालक  मंडळींचं  मत )

परवा आईच म्हणाली ,आता facebook “join” करायला पाहिजे
रोज तुझ्यासाठीचे, तुझ्याच “wall” वर post करायला पाहिजे

बाबांशीपण chat वर बोलत जा अधून मधून
तिथेच तुझे status updates टाकत जा मधून मधून

आई बाबा म्हणून तिथे relationship कर हो add
तुलाही आठवण होत राहील, आमच्या दृष्टीनं असेना का फॅड

सणाबिणाला सुंदरसं ग्रीटिंग पाठव मला,शुभेच्छांच्या वर्षावांचं
fathers/mathers dayला टाक update  भावनांच्या ओलाव्यांचं

मी करेन like सारंच, तसंही मी कधी काही dislike केलंय?
असं समज real मनाच्या request ला virtual मनानं accept केलंय

पल्लवी कदडी

0 comments:

Post a Comment