Wednesday, 30 April 2014
तुकडोजी महाराज जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम
या झोपडीत माझ्या
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
भूमीवरी पडावे, तार्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
पहारे आणि तिजोर्या, त्यातूनी होती चोर्या
दारास नाही दोर्या, या झोपडीत माझ्या॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥
Tuesday, 29 April 2014
Monday, 28 April 2014
Saturday, 26 April 2014
वागणूक ...
माउली नंतर समाधी नाही | तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही |
शिवराया नंतर छत्रपती नाही |
गंधर्वा नंतर गाणं नाही |
माशा नंतर पोहणं नाही |
रामा नंतर आचरण नाही |
रावना नंतर श्रीमंती नाही |
गरुडा नंतर भरारी नाही |
मेघा नंतर उदारता नाही |
कर्णा नंतर औदार्य नाही |
साधु नंतर कृपा नाही |
देवा नंतर आशिर्वाद नाही | आई नंतर प्रेम नाही |
मृत्यू नंतर भय नाही |
नर देहा नंतर पुन्हा देह नाही |
आणि जिवन जगताना हे मि कधीच विसरत नाही,
म्हणून चांगलं वागता आलं नाही तरी चालेल पण ; जाणीवपुर्वक वाईट
कधीच वागत नाही. ||
Friday, 25 April 2014
Thursday, 24 April 2014
Wednesday, 23 April 2014
Tuesday, 22 April 2014
Monday, 21 April 2014
Saturday, 19 April 2014
Friday, 18 April 2014
Thursday, 17 April 2014
Wednesday, 16 April 2014
Tuesday, 15 April 2014
Monday, 14 April 2014
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा
हनुमान जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा
तरुन जो जाइल सिंधु महान
असा हा एकच श्रीहनुमान्
भुजंग धरुनी दोन्हीं चरणीं
झेपेसरशी समुद्र लंघु
गरुड उभारी पंखे गगनीं
गरुडाहुन बलवान्
अंजनिचा हा बलाढ्य आत्मज
हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज
निजशक्तीनें ताडिल दिग्गज
बलशाली धीमान्
सूर्योदयिं हा वीर जन्मला
त्रिशत योजनें नभीं उडाला
समजुनिया फळ रविबिंबाला
धरुं गेला भास्वान्
बाल-वीर हा रवितें धरितां
भरें कापरें तीन्ही जगतां
या इवल्याशा बाळाकरितां
वज्र धरी मघवान्
देवेंद्राच्या वज्राघातें
जरा दुखापत होय हनुतें
कोप अनावर येइ वायुतें
थांबे तो गतिमान्
पवन थांबता थांबे जीवन
देव वायुचें करिती सांत्वन
पुत्रातें वर त्याच्या देउन
गौरविती भगवान्
शस्त्र न छेदिल या समरांगणिं
विष्णुवरानें इच्छामरणी
ज्याच्या तेजें दिपला दिनमणी
चिरतर आयुष्मान्
करि हनुमन्ता, निष्चय मनसा
सामान्य न तूं या कपिजनसा
उचल एकदां पद वामनसा
घे विजयी उड्डाण
Sunday, 13 April 2014
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्या ..
भारतीय राज्य घटनेचेनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्या ..
Saturday, 12 April 2014
तुझ्या गालावरची खळी...
तुझ्या गालावरची खळी..
चॉकलेटच्या कागदानी काढली हळूच खोडी,
आठवली आपल्यातली चोरटी देणीघेणी,
प्रत्येक वेळी हसताना तू हळूच मान वळवायची,
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...
ओठ बोलण्याआधी तुझे डोळेच सगळ बोलायचे,
पापण्यांच्या आडून मला हलकेच चिडवायचे,
मिटल्या डोळ्यांपुढेही तुझीच रूपे फेर धरायची
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...
ठरवायचो स्वत:शी, नाहीच तिथे बघायचं..
माझ्या निर्धारच बळ दहा मिनिटही नाही टिकायचं,
किती नाही म्हंटल तरी आपसूक नजर वळायची,
तुझ्या गालावरची खळी मला रोज प्रेमात पाडायची...
माझ्या स्वप्नातली तू आजही तशीच आहेस...
शेवटच चॉकलेट मनात आजही जपल आहे,
माहित आहे मला आता नाही वाट पाहायची,
कारण ती खळी आता पुन्हा नाही दिसायची,
जी मला रोज रोज तुझ्या प्रेमात पाडायची....
तुझ्या गालावरची खळी....
मोनीष शेखर चौबळ
Friday, 11 April 2014
बलात्कारित महिलेलाही फाशी द्या!: आझमी
आता या नेत्याना काय बोलायचे
बलात्कारित महिलेलाही फाशी द्या!: आझमी
‘बलात्कारासारख्या चुका तरुण पोरांकडून कधी-कधी होतात,’ असं म्हणून खळबळ उडविणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनाही लाजवेल असं वक्तव्य त्यांचे महाराष्ट्रातील ‘चेले’ अबू आझमी यांनी केलं आहे. ‘विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या महिलेबरोबरच बलात्कार झालेल्या महिलेलाही फासावर लटकवायला हवं,’ अशी मुक्ताफळं अबूंनी उधळली आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती...
महात्मा ज्योतीबांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे येथे झाला.
थोर समाज सुधारक, बहुजन शिक्षणाचे जनक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक, विज्ञानवादी,स्त्रीसुधारणावादी,लोकहितवादी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, त्या समाधीची रीतसर पूजा करून शिवजयंतीची सुरुवात केली. हिंदवी स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांना "कुळवाडी भूषण"म्हणून संबोधिले.
समाजातील अनिष्ठ रूढी परंपरा यांच्या विरुद्ध त्यांनी उभारलेला लढा हा खरोखरच जगासाठी एक प्रेरणा आहे. शिक्षणाची गंगा सामान्य अति-
सामन्यांच्या पर्यंत त्यांनी पोहचवली.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।
जोतीराव गोविंदराव फुले
या महापुरूषास मानवंदना....
कोटी कोटी प्रणाम..
जय जोती, जय क्रांती
Thursday, 10 April 2014
Wednesday, 9 April 2014
लोकशाही…२०१४
ना ’शरदा’चे चांदणे
ना ’सोनिया’चा दिस
’घड्याळा’चे ओझे ’हाता’ला
म्हणून ’आय्’ कासावीस!
’कमळा’च्या पाकळ्यांची
’यादवी’ छ्ळते मनाला
’धनुष्य’ आलयं मोडकळीस
पण जाणीव नाही ’बाणा’ला!
’विळा, हातोडा’ आणि ’कंदीला’ला
आजच्या युगात स्थान नाही
डब्यांना ओढू शकेल एवढी
’इंजिना’त जान नाही!
’मन’ आहे ’मुलायम’
पण ’माया’ कुठेच दिसत नाही
’हत्ती’वरून फिरणारा
’सायकल’वर बसत नाही!
कितीही उघडी ठेवा ’कवाडे’
’प्रकाश’ आत जाणार नाही
विसरलेले ’आठवले’ तरीही
’गवई’ गीत गाणार नाही!
’बंडखोर पक्षां’चा थवा
’पार्टी’साठी आतूर
कुंपणच खातय शेताला
आणि बुजगावणंही फितूर!
Tuesday, 8 April 2014
Monday, 7 April 2014
एका खराब खेळीने तुम्ही युवराजला विसरले?
भारत विजेता!
सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३० चेंडुत ७० धावांची खेळी करुन भारताला फायनलमध्ये पोहचवनारा- युवराज सिंग
ICC विश्वचषक २०११:
भारत विजेता!
फलंदाजी आणि गोलंदाजीत अष्टपैलु कामगिरी करुन मालिकाविर ठरलेला- युवराज सिंग
एका खराब खेळीने तुम्ही युवराजला विसरले?
* विसरु नका ज्याने कँसरला मात करुन भारताला २८ वर्षानंतर विश्वचषक जिंकवुन दिला.
* तो एकटाच आहे ज्याने सचिनचे २२ वर्षाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार केले.
* हा तोच आहे ज्याने T20 विश्वकप २००७ मध्ये ६ चेंडुत ६ गगनभेदी षटकार ठोकले होते.
* हा तोच आहे ज्याने आपल्या बॅटिंग आणि फिल्डिंगने भारताला अनेक सामने जिंकुन दिले.
क्रिकेट हा खेळ आहे यात हार जित होतच राहणार..
आज तुमचा तर उद्या दुसऱ्याचा दिवस असणार आहे.
तेव्हा कोणा एका खेळाडुला दोषी न ठरवता खेळाचा आनंद लुटा!!
Sunday, 6 April 2014
मनाचा तळ
स्वच्छ पाण्याचा जसा तळ दिसत असला ना की,
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या बाबतीत असतं त्याच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही...आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं...!!
Saturday, 5 April 2014
अंगठी अनामिकेत का ???
अंगठी अनामिकेत का ???
विवाह निश्चित झाल्याची खूण म्हणून वाग्दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत
अंगठी घालतात.
ही अंगठी अनामिकेतच
का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत?
एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा ....
.
.
त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे. हे एक कुटुंब.
त्यातील अंगठा हे आपल्या आई-वडिलांचे प्रतीक.
अंगठ्याजवळचे बोट आपल्या भावंडांचे प्रतीक.
मधले बोट म्हणजे आपण स्वत:
चौथे अनामिका... म्हणजे आपला जोडीदार,
तर करंगळी म्हणजे आपली अपत्ये.
ही झाली गृहीतकं.
आता पाहू या कुटुंबातील
या घटकांशी आपली नाती कशी आहेत
ती.
हाताचे तळवे नमस्काराप्रमाणे जोडा.
मधली बोटे दुमडून बाकी बोटांची फक्त वरची टोकं जुळवा. आता प्रथम अंगठे एकमेकांपासून दूर करा. ते उघडता येतील. कारण आई-वडील काही जन्मभर लाभत
नाहीत. कधी ना कधी ते
आपल्याला सोडून जातात.
.
.
अंगठे मिटवून त्याच्या शेजारील बोटे उघडा. तीही उघडतील. कारण भावंड त्यांना त्यांची कुटुंबं आहेत. स्वत-ची आयुष्यं आहेत.
.
.
आता ती बोटं जुळवून
आपल्या करंगळ्या उघडा. त्याही उघडतील. कारण तुमची मुलं मोठी झाल्यानंतर घरटं सोडून भरारी घेणारच आहेत.
.
.
आता करंगळ्या मिटा आणि अनामिका एकमेकांपासून वेगळ्या करा.
आश्चर्य वाटेल; पण त्या वेगळ्या होत नाहीत. कारण जोडीदार, म्हणजे
पती-पत्नी आयुष्यभरासाठी एकत्र राहणार असतात.
ते सुखात आणि दुखातही एकमेकांना साथ देतात...!