खल भावानंची आम्ही करणार होळी,
अशी आगळीच आता जा ळणार होळी
दाही दिशांत चेतवू वणवा असा की,
या विश्वात ना ती सामावणार होळी
अबलांचे व्हावे असे सबलीकरण,
मग कोण करण्या थजावणार होळी
आमच्या जीवांशी ज्यांनी केळला
शिमगा
आज आम्ही त्यांची पेटविणार होळी
ज्ञानगंगेच्या रंगात न्हाऊ जर का सारे
अंधविचारांची कशी नाही होणार होळी
द्वेषाग्नीला हवी फुंकर प्रेमाची
द्वेषाने का? द्वेषाची विझणार होळी
घरोघरी जेव्हा विखुरतील सप्तरंग
तेव्हाच खरी देशांत रंगणार होळी.
अनिल कोशे
0 comments:
Post a Comment