Breaking News
Loading...
Monday, 27 January 2014

Info Post
पतीच्या उपचारासाठीसाठी बारामती मॅरेथॉनमध्ये धावली ६६ वर्षीय माऊली - घरी अठराविश्व दारिद्र्य गाठीला असणारा पैसा तिनीही मुलींच्या लग्न खर्च झाला. वृद्ध झालेल्या पतीचे आजारपण, मोलमजुरी करून चालवलेला संसाराचा गाडा. पती तर आजारातून उठला पाहिजे ही एकमेव आशा, परंतु तेवढे पैसेही गाठीला नाहीत आणि या जिद्दीच्या जोरावरच या माऊलीने बारामती मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि पतीच्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावत ही मॅरेथॉन जिंकलीही.

तीन किलोमीटर अंतराच्या या मॅरेथॉनमध्ये या ६६ वर्षाच्या माऊलीने आपल्या नववारी साडीसह अनवाणी पायाने धावत ही स्पर्धा जिंकली. पतीचे एम.आर.आय स्कॅन करण्यासाठीच्या पैशासाठीच आपण धावलो आणि त्यात आपण जिंकलो हे समाधान या माऊलीच्या चेहर्यावर झळकत होते.

एरव्ही स्पोर्टशूज घालून धावणारे स्पर्धकांनाही लाजवणार्या या माऊलीचे नाव आहे लता भगवान करे मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर गावच्या रहिवाशी असणार्या या माऊली या अगोदर कुठल्याही मॅरेथॉनचा अनुभव नसतानाही रोज सकाळी शेतात जाऊन काम काम करणे आणि घरात जे काही असेल ते खाणे हाच या यांचा डाएट आणि अनुभव. परंतु अंथरुणाला खीळलेल्या पतीला बरे करण्याच्या उद्देशाने अनवाणी पायाने कडक्याच्या थंडीत धावणार्या या माऊलीच्या जिद्दीने उपस्थितांचे डोळे पाणावले व माऊलीला सलाम केला. यावेळी यापुढेही होणार्या मॅरेथॉनमध्ये धावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

0 comments:

Post a Comment