Tuesday, 12 February 2013

॥ श्री गणेशाय नमः॥ ॥ ॐ गं गणपतये नमः॥
आज गणेश जयंती. सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर आज आपल्या लाडक्या बाप्पाच्या जन्मदिनी मुंबई येथील सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेऊया.

गणेश जयंती माघ शुद्ध चतुर्थीला असते. गणेशाची एकूण २४ रूपे आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा शिव-पार्वतीचा पुत्र गजाननाचा तर माघ शुद्ध चतुर्थी हा आदिती तसेच कश्यप मुनी आणि अदिती या दाम्पत्याचा पुत्र 'महोत्कट विनायकाचा' जन्मदिवस. या दोन्ही तिथींना सारखेच महत्त्व आहे. आजच्या गणेश जयंती दिवशी आपण गणपतीच्या ह्या रुपांना आणि त्याचबरोबर सिध्दि-बुध्दिनांही मनोभावे वंदन करुया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमुर्ती मोरया.

No comments:

Post a Comment