Friday, 30 January 2015

वाढदिवस!!

 रोजच्या धकाधकीच्या जगण्यात येतो एक आड दिवस
आला आहे अगदी आज, जसा तुझा वाढदिवस
तुझ्या आकांक्षापुढे होऊ दे गगन ठेंगणे
तुझ्या संगतीत शिकतील सारे स्वप्न रंगणे
जगण्याचा एक दिलासा, तुझ्या हसण्यात
अन मग झोकुन द्यावे पुन्हा वाटते जगण्यात
पुरावावेत सारे लाड तुझे, आज तुझा लाड दिवस
मनमानी करून घेण्यासाठीच असतो ना वाढदिवस!!
काय भेट द्यावी तुला? प्रश्न असा पडला...
रम्य एक सायंकाळ, त्यावर चन्द्र जडला..
ता-यानी लगड़लेले डोईवर आकाश खुले
तुला देण्यासाठी माझ्याकडे हीच शब्द्फुले
जगण्याचे असू देत सारे, नकोत नुसते 'काढ'दिवस
माझ्या शुभेच्छा तुझ्यासाठी, सारेच व्हावेत वाढदिवस!!
-जय
#MarathiKavitaBlog

No comments:

Post a Comment