Tuesday, 4 February 2014

आपला सचिन ‘भारतरत्न’ झाला!

आपला सचिन ‘भारतरत्न’ झाला!

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमादित्य, भारतीय क्रिकेटप्रेमींचा 'देव' मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा. सीएनआर राव यांना आज 'भारतरत्न' सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या शाही सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशाच्या या दोन रत्नांना मानाचं पान आणि सनद देऊन गौरवलं. 'आपल्या सचिन'नं 'भारतरत्न' स्वीकारला तो क्षण, त्याच्या लाखो चाहत्यांसाठी आणि तमाम महाराष्ट्रीयांसाठी अभिमानास्पदच होता.

No comments:

Post a Comment