Breaking News
Loading...
Tuesday, 29 October 2013

Info Post

कालचा दिवस मला खूप काही शिकवून गेला हे खरं;
पण मी आज जे करेन त्यावर माझा उद्या आकाराला येईल,
हे मला समजलं आहे.
*********************

आजचा दिवस मी उमेदीने,हिमतीने,जिद्दीने आणि
मनापासून जगेन,कारण हा दिवस
माझ्या आयुष्यात पुन्हा कधी उगवणार नाही,
हे मला ठाऊक आहे.
*********************

आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली
शेवटची संधी असू शकेल.
उद्याचा सुर्योदय मी पाहीनच याची काय खात्री?
*********************

आज मी हरणार नाही. मागे पाहाणार नाही,
अश्रु ढाळणार नाही, एकही संधी हातची जाऊ देणार नाही.
आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान संपत्तीची
उत्तम गुंतवणूक करीन: वेळ
*********************

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,निदान एक
काम पुर्ण करीन,निदान एक अडथळा ओलांडीन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
********************

आज मी चिडणार नाही,वैतागणार नाही, धुसफुसणार नाही.
मनावरचं निराशेचं मळभ हटवून आज मी प्रसन्न हसेन.
*********************

आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन.
आणि आकाशात नजर लावून तिथे
चमकणारी माझ्या स्वप्नाची नक्षत्रं डोळे भरून पाहीन.
***************************

आज निदान एवढं तरी मी करीनच.!

0 comments:

Post a Comment

:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.