Thursday, 30 July 2015

गुरु‬ ~ गुरुपोर्णिमा‬ च्या हार्दिक शुभेच्छा ||

#‎गुरु‬
गुरु भक्तांची माऊली
तप्त उन्हात ती सावली
अनुग्रहे करतात पावन
धरावे तयांचे चरण 


संकटात तारुनी नेतात
दासावरी पाखर घालतात
सुखकर्ता दु:खहर्ता
तोची सर्व कर्ता करविता

अशांती घालवून टाकी
गुरू माझा माझी लाज राखी
"स्मरण" ठेवुन जो स्मरण करी
तो त्यासीच उद्धरी

शब्दांची रत्ने ओसंडती
नुरे सहवासाने
भिती सत्संग करुनी सांगे सार
देई सदा सद्विचार

प्रारब्ध जरी दृढतर
करी सद्गुरु सकळ दूर
ऎशा सांगे गुजगोष्टी
सुखी होती दिन कष्टी

-मनोम

Wednesday, 29 July 2015

फुलराणी......

फुलराणी......

तिच्या गो-यापान हातावर
मेंदी कशी खुलून यायची
त्यात ती येताना ओठांवर
जास्वंद चुरडून यायची

ती हसताना प्राजक्तं सांडायची,
अंगभर चाफा लावून यायची
बोलताना ओठ मुडपायची, इकडे
माझ्या कानाची पाळी लाल व्हायची

काळ्याभोर शेपट्यावर कधी मोगरा,
कधी अबोली माळून यायची
मंद वारा जरी स्पर्शला तिला
तरी ती अत्तराची कुपी होउन जायची

चुकून किंवा मुद्दाम, जरा झाला स्पर्श,
ती लाजाळूचं झाड व्हायची
तिचे मेंदीचे हात हातात घेतले की
ती माझी वेल व्हायची

 जयंत विद्वांस

Monday, 27 July 2015

डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन

भारताचे माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. शिलाँग येथील आयआयएममध्ये व्याख्यान देत असताना अब्दुल कलाम अचानक व्यासपीठावर कोसळले. त्यानंतर कलाम यांना त्वरित नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रात्री पावणे आठच्या सुमारास कलाम यांनी अखेरचा श्वास घेतला.
कुणी जातो हज, कुणी काशीला !
जनमनांस लावुनी चटका,
पुण्यात्मा गेला एकादशीला....

आषाढी‬ ‪‎एकादशी‬

‪#‎आषाढी‬ ‪#‎एकादशी‬
पंढरीच्या ‪#‎पांडुरंगा‬.......!
बळीराज्यावरच हे आलेले दुष्काळाच
संखट दुर कर येवढीच
पांडुरंगा तुझ्याचरणी प्रार्थना...

सात्विक आनंदा साठी वाचा फक्त मराठी कविता ब्लॉग !

सात्विक आनंदा साठी वाचा फक्त मराठी कविता ब्लॉग !
आपल्या मराठी कविता ब्लॉग चे वाचक अमोल गावली यांनी बनवलेले मजेशीर व्यंगचित्र . खूपच छान अमोल ! मराठी कविता ब्लॉग आपला खूप खूप आभारी आहे !

Thursday, 23 July 2015

" अति इंटरनेट ही बरे नसे..... "

" अति इंटरनेट ही बरे नसे..... "

Wednesday, 22 July 2015

लावणी

आपल्या मराठी कविता ब्लॉग च्या वाचक सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे यांची अतिशय सुंदर लावणी ! कृपया आपला अभिप्राय कळवा.

लावणी

राया माझा पदर सोडा लावून देते विडा
मागे मागे करू नका द्या हो कात केवडा

माझे रूपडं हो सोन बावनकशी
भरली उभारी हो भरली पेर जशी
नका सतावू जाऊ द्या ना
नुकतच सरली सोळा

पदर सावरते परी ढळतो कसा
केस आवरते तरी सुटतो कसा
तुम्हास बघते दारा आडून धीर करून गोळा

तुम्ही याव म्हणून रोज भिजते ऊशी
तुम्ही दिसलात की होते वेडी
पिशी तुमच्यासाठी सजते श्रृंगार करून सोळा

-- सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे

Tuesday, 21 July 2015

मित्र समजू नकोस ~ मैत्रीच असू दे ....

मित्र समजू नकोस ~ मैत्रीच असू दे ....

Monday, 20 July 2015

सुप्रभात ~ सुविचार

सुप्रभात ~ सुविचार

Sunday, 19 July 2015

आपण प्रथम भेटलो तेथे

आपण प्रथम भेटलो तेथे
मन माझं पुन्हा पुन्हा फिरून जातं
सा-या खुणा तशाच असतात
तुझं असणं मात्र बाकी रहातं ...



ती वेळ खरच खास असेल

ती वेळ खरच खास असेल

जरा स्वतः काढे बघूया

जरा स्वतः काढे बघूया

कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर

कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर
त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्या नंतर
अवचित कधी सामोरे यावे
अन्‌ श्वासांनी थांबून जावे
परस्‍परांना त्रास तरीही परस्‍परांविण ना गत्‍यंतर
मला पाहुनी दडते, लपते
आणिक तरीही इतुके जपते
वाटेवरच्या फुलास माझ्या लावून जाते हळूच अत्तर
भेट जरी ना या जन्‍मातून
ओळख झाली इतकी आतून
प्रश्‍न मला जो पडला नाही, त्याचेही तुज सुचते उत्तर
मला सापडे तुझे तुझेपण
तुझ्याबरोबर माझे मीपण
तुला तोलुनी धरतो मी अन्‌ तूही मजला सावर सावर
मेघ कधी हे भरून येता
अबोल आतून घुसमट होता
झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर
- संदीप खरे

Thursday, 16 July 2015

तु दिलेले प्रेमपत्र

बदल तच असत रे
एका मागुन एक नक्षत्र
आजही आवडीने वाचते
तु दिलेले प्रेमपत्र

Thursday, 9 July 2015

पप्पा

पप्पा

असतील जगात जन्मदाते कित्येक
पप्पा माझे आहेत लाखात एक

न भेद केला कधी मुला मुलीचा
प्रत्येक भाव जाणिला माझ्या मनिचा

सवंगडी म्हणुनी मजसवे खेळले
सखिसारखे हितगुज ग केले

जीवनी खचले मी कित्येक वेळा
जवळी मज केले म्हणुनी
बाळा

जेव्हा मज संकटांनी घेरले
जावुनि त्यांच्या कुशीत निजले

दिला मग तेव्हा त्यानी उबारा
दुसरा काय पिल्लाला हवा आसरा

पिल्लू ग मी त्यांचे चिमुकले
पंखांखाली मायेच्या भय सम्पले

म्हणतात मज आता ते मार भरारी
सोडूनि कसे जावे शल्य हेच उरी

घरट्याकडे नजर जाई वेळोवेळी
पडले बाहेर घरट्यातून कधी काळी

हसत मज निरोप देता डोळे पुसतात वळुनी
मला म्हणे न रडता जा पाहु उडुनी

कोण मायेने पांघरेल मज
कोण म्हणेल ये बाळ कुशीत निज

मानते मी त्यानाच सर्वकाही
त्याजागी मजला दूजे कुणी नाही

भाव हे सारे आठवूनी
येते भरुनी पाणी नयनीं

प्रत्येक जन्मी मिळो मज हेच पप्पा
एकच प्रार्थिते तुज देवबाप्पा ! ! !

. . . . सौ. राखी हिरेमठ . . जुन १९९४

मैत्री म्हणजे काय?

मैत्री म्हणजे काय तर मैत्री म्हणजे प्रेम
प्रेमानं प्रेमावर साधलेला अचूक नेम


मैत्री म्हणजे विश्वास, मैत्री नाते खास
आनंद, जिव्हाळ्याचा तो एक घास सुग्रास

मैत्री म्हणजे कोणत्याही नात्यापेक्षा मोठे
मैत्रीशिवाय मित्राने जावे तरी कोठे

मैत्री म्हणजे अधिकार, मैत्री म्हणजे हक्क
अतुट असते नाते असते बंधन पक्कं

मैत्री म्हणजे माझा आवडता विषय आहे
मैत्री विषय आहे म्हटल्यावर बोलणे भाग आहे

मैत्रीचा हात म्हणजे खात्रीची ठेव
मैत्री अतूट असताना का वाटावे भेव

आईशी सुध्दा असु शकते मैत्री, असु शकते सुध्दा वडिलांशी
बंधन कुठे असते नात्याचे मैत्रीपाशी

मनोमेघ

हा पाऊस आणि तुझी आठवण

हा पाऊस आणि तुझी आठवण
 दोन्ही आडवता येत नाही 
पण त्याना आडवायचं
 का हा प्रश्न मनाला सोडवता येत नाही.
~ चंद्रशेखर गोखले 

Tuesday, 7 July 2015

सरीवर सर ....

सरीवर सर ....

दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....

तडातडा गार गारा गरागरा फिरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपिस मखमल ! उतू गेले मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून
फिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर
सरीवर सर .... सरीवर सर ....

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल .... गेले जल .... झाले जल आरपार
सरीवर सर .... सरीवर सर ....

अशा पावसात सये व्हावे तुझे येणे-जाणे
उमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे
जशी ओली हुरहुर थरारते रानभर
तसे नाव तरारावे माझे - तुझ्या मनभर !
सरीवर सर .... सरीवर सर ....

संदीप खरे

Thursday, 2 July 2015

तुझ असे सजणे..

तुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे..
काबूत रहाव तुझ्या नेहमी..असे सौंदर्य तुझ डोळ्यात भरणे..

का नाही मोह करावा तुझ्या एक कटाक्षाचा मी..
तुझ्या वाटेवरती कमी वाटते हृदय हे अंथरणे...


दंग होई कुणी असा तुझा साज..
मखमली गालाला नथनीचा बाज..

किती नाजूक आहेस तू तेव्हा देव हि हळवा झाला असेल..
पाठवले तुला धरतीवर तेव्हा एक तारका कमी झाली असेल..

भाळणे सौंदर्याला हि साहजिक गोष्ट खरी..
पण तुझ्या सौंदर्यात साधेपणाची मूर्ती दिसते बरी..

ह्या लक्ष दिव्यांचा उजेड कमी भासतो..
जेव्हा तुझ्या भाळी चंद्रकोर उजळतो..

तुला पाहून का असे वाटते कि तू खूप भावूक असावी..
जशी सारी शालिनता जगातली फक्त या डोळ्यातच उरली असावी..

त्या पापण्यांच्या मेघांनी एक साद दिली असावी..
अन क्षणात सारी धरणी हिरवीगार भिजून होत असावी.

Wednesday, 1 July 2015

पून्हा पावसाचे दिवस...

पून्हा पावसाचे दिवस अन पून्हा तुझं तसच
वागणं....
खिडकी लाऊन घेताना तिरप्या नजरेनं
बघणं ....
-चंद्रशेखर गोखले

| बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल |

" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल |
देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल ||१ ||
माता विठ्ठल, पिता विठ्ठल |
बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल ||२ ||
गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल |
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ||२ ||
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला |
म्हणुनी कळीकाळा पाड नाही ||४ ||


" | बोलावा विठ्ठल | | पहावा विठ्ठल | "